पालकमंत्री शिरसाट यांनी जलसंधारण सप्ताहाची दिली शपथ
छत्रपती संभाजीनगर, 15 ऑगस्ट (हिं.स.)। पालकमंत्री शिरसाट यांनी जलसंधारण सप्ताहाची शपथ दिली. तसेच यानिमित्ताने राबविण्यात येणाऱ्या सप्ताहाच्या लोगोचे अनावरणही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच विविध पुरस्कार वितरण व लोकार्पण सोहळ्याला पालकमंत
Q


छत्रपती संभाजीनगर, 15 ऑगस्ट (हिं.स.)। पालकमंत्री शिरसाट यांनी जलसंधारण सप्ताहाची शपथ दिली. तसेच यानिमित्ताने राबविण्यात येणाऱ्या सप्ताहाच्या लोगोचे अनावरणही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच विविध पुरस्कार वितरण व लोकार्पण सोहळ्याला पालकमंत्र्यांनी उपस्थिती लावली. उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आदिंना भेटून त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

स्वच्छता वाहनांचे लोकार्पण

याप्रसंगी पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते सात जेटींग स्वच्छता वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. ही वाहने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, कन्नड, पैठण, सोयगाव, वैजापूर, फुलंब्री, गंगापुर या नगरपालिकांना वितरीत करण्यात आली.

कक्ष नुतनीकरण उद्घाटन

त्यानंतर पालकमंत्री शिरसाट यांनी विभागीय आयुक्त कार्यालयातील दालन व कक्ष नुतनीकरणाचे उद्घाटन करुन पाहणी केली व मराठवाडा मुक्ती संग्राम स्मारकाच्या बांधकामाबाबत आढावाही घेतला.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande