छ. संभाजीनगर : सर्वसामान्य माणूस हाच विकासाचा केंद्रबिंदू - पालकमंत्री संजय शिरसाट
छत्रपती संभाजीनगर, 15 ऑगस्ट (हिं.स.)। विविधतेने नटलेला आपला देश एकसंघ ठेवण्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेचे मोठे योगदान आहे. जिल्ह्याचा विकास करत असतांना सर्वसामान्य माणूस हाच केंद्रबिंदू आहे. आपण समाजातील सर्व घटक मिळून विकास प्
Q


छत्रपती संभाजीनगर, 15 ऑगस्ट (हिं.स.)। विविधतेने नटलेला आपला देश एकसंघ ठेवण्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेचे मोठे योगदान आहे. जिल्ह्याचा विकास करत असतांना सर्वसामान्य माणूस हाच केंद्रबिंदू आहे. आपण समाजातील सर्व घटक मिळून विकास प्रक्रियेत सहभागी होऊ,असे आवाहन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केले.

देशाचा ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. जिल्ह्याचा मुख्य शासकीय सोहळा विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला. प्रारंभी वंदेमातरम गायन झाले. त्यानंतर पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. पोलीस वाद्यवृंदाच्या तालावर राष्ट्रगीत होऊन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. त्यानंतर राज्यगीत झाले. आपल्या संबोधनात पालकमंत्री शिरसाट यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण केले. हुतात्म्यांना अभिवादन करुन आदरांजली वाहिली.

सोहळ्यास विधानपरिषदेचे सदस्य आ. अंबादास दानवे, माजी खा. चंद्रकांत खैरे, विभागीय आयुक्त जी.श्रीकांत,जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. तसेच सर्व वरिष्ठ अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.

त्यानंतर ते म्हणाले की,देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा होत असतांना या आनंदात प्रत्येक देशवासी सहभागी झाला आहे.आपापसातले सर्व भेद विसरुन सर्व जाती धर्माचे लोक एकत्रितपणे स्वातंत्र्याचा आनंद घेत आहेत, हे या देशाचे वैशिष्ट्य आहे. विविधतेने नटलेला हा देश एकसंघ ठेवण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेचे मोठे योगदान आहे. आपल्या सगळ्यांसाठी आपली राज्यघटना सर्वोपरी आहे. आपल्या आधीच्या पिढ्यांनी केलेल्या त्याग आणि बलिदानामुळेच हे स्वातंत्र्य आपण उपभोगत आहोत,याचे स्मरण प्रत्येकाने ठेवावे असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, आपले राज्य प्रगती करत असतांना शासनाचा केंद्रबिंदू हा सर्वसामान्य माणूस आहे. विकास करतांना तो सर्व घटकांचा झाला पाहिजे, हेच शासनाचे धोरण आहे. आपण सर्व मिळून त्यात सहभागी होऊ. एकत्रितपणे देशाचा विकास करु,असे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यात शासनामार्फत विविध योजनांद्वारे लोकांना देण्यात येत असलेला लाभ, घाटी रुग्णालयाला सुपर स्पेशालिटी रुग्णालय बनविण्याचा संकल्प, खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा, अत्याधुनिक अग्निशामक दल अशा अनेक सुविधा उपलब्ध करुन देत असल्याबाबत त्यांनी उपस्थितांना सांगितले.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande