सोलापूर : अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय स्मारक व धनगर विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी दोन एकर जागेची मागणी
सोलापूर, 15 ऑगस्ट (हिं.स.)। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या महान कार्याची प्रेरणा भावी पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी राष्ट्रीय स्मारक उभारण्यासह धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्याकरिता सोलापूर येथील शासकीय दूध डेअरी परिसरातील दोन एक
sdfg


सोलापूर, 15 ऑगस्ट (हिं.स.)। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या महान कार्याची प्रेरणा भावी पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी राष्ट्रीय स्मारक उभारण्यासह धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्याकरिता सोलापूर येथील शासकीय दूध डेअरी परिसरातील दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने केली आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाकडे मागणी करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल आणि सभागृह नेते नरेंद्र काळे यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले.

धनगर समाजातील अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातून उच्च शिक्षणासाठी सोलापूर शहरात येतात. मात्र, शहरात निवासाची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वसतिगृह उभारण्यात आल्यास त्यांना शिक्षणासाठी मोठी मदत होईल आणि अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळेल, अशी भावना शिष्टमंडळाने व्यक्त केली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी कार्याचा वारसा जपण्यासाठी तसेच त्यांच्या प्रेरणादायी विचारांची माहिती भावी पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी राष्ट्रीय स्मारक उभारणे आवश्यक असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी महापौर विनायक कोंड्याल आणि सभागृह नेते नरेंद्र काळे यांना निवेदन देताना अर्जुन सलगर, नगरसेवक राजकुमार पाटील, प्रा. देवेंद्र मदने आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande