इंग्लंड मालिकेपूर्वी बाबर आझमच्या हाताला दुखापत, सराव सामन्यातून बाहेर
लंडन, १५ ऑगस्ट (हिं.स.) इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेपूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. प्रोफेशनल काउंटी क्लब सिलेक्ट इलेव्हनविरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान कसोटी कर्णधार बाबर आझमच्या हाताला दुखापत झाली आहे. ही दुखापत किती गंभीर आहे हे
बाबर आझम


लंडन, १५ ऑगस्ट (हिं.स.) इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेपूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. प्रोफेशनल काउंटी क्लब सिलेक्ट इलेव्हनविरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान कसोटी कर्णधार बाबर आझमच्या हाताला दुखापत झाली आहे. ही दुखापत किती गंभीर आहे हे अजून स्पष्ट झालेले नाही.

बाबर पाच धावांवर फलंदाजी करत असताना, इंग्लंडच्या १९ वर्षांखालील वेगवान गोलंदाज मॅनी लम्सडेनचा उसळता चेंडू त्याच्या हाताच्या खालच्या भागाला लागला. चेंडू लागल्यानंतर बाबर वेदनेने विव्हळत असल्याचे दिसले आणि त्याने पुढे फलंदाजी केली नाही.आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितले की, संघाच्या डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर, खबरदारीचा उपाय म्हणून बाबरला उर्वरित सराव सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे.पीसीबीने म्हटले आहे, संघाच्या डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर आणि खबरदारीचे उपाय म्हणून, बाबरला उर्वरित सराव सामन्यासाठी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. बाबर १७ ऑगस्ट रोजी हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर पाकिस्तानच्या सराव सत्रात सहभागी होईल. संघ व्यवस्थापनाकडून त्याच्या तंदुरुस्तीवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल.

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांची कसोटी मालिका १९ ऑगस्टपासून सुरू होत आहे. ही मालिका आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप २०२५-२७ चा भाग आहे. गुणतालिकेत इंग्लंड सातव्या आणि पाकिस्तान आठव्या क्रमांकावर आहे.पाकिस्तानने वेस्ट इंडिजविरुद्धची आपली शेवटची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. दुसऱ्या कसोटीत आठ गडी राखून विजय मिळवून पाकिस्तानने परदेशातील सलग आठ कसोटी पराभवांची मालिका खंडित केली. मालिका सुरू होण्यापूर्वी बाबर पूर्णपणे तंदुरुस्त होईल अशी पाकिस्तानला आशा असेल. दरम्यान, शान मसूदचे दुखापतीतून पुनरागमन संघासाठी दिलासादायक आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande