सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वजनिक वाहतुकीला पीएम ई-बसची नवी ताकद
सोलापूर, 15 ऑगस्ट (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिकेची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि आधुनिक करण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या पीएम ई-बस सेवेचे आज मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या ई-बस सेवेमुळे सोलापूरकरांना सु
gfd


सोलापूर, 15 ऑगस्ट (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिकेची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि आधुनिक करण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या पीएम ई-बस सेवेचे आज मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या ई-बस सेवेमुळे सोलापूरकरांना सुरक्षित, आरामदायी आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीचा लाभ मिळणार आहे.

या ई-बसचे लोकार्पण पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, सभागृह नेते नरेंद्र काळे, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर आणि शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

सोलापूर शहराचा वाढता विस्तार आणि सार्वजनिक वाहतुकीची वाढती गरज लक्षात घेता पीएम ई-बस सेवा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रदूषणमुक्त आणि आधुनिक वाहतूक व्यवस्था उभारण्याच्या दिशेने या सेवेमुळे सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेला नवी दिशा मिळणार आहे.

ई-बस सेवेमुळे नागरिकांना अधिक चांगली, सुरक्षित आणि सुविधाजनक सार्वजनिक वाहतूक उपलब्ध होईल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. शहराच्या विकासासोबतच नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्याचे प्रयत्न पुढेही सुरू राहतील, असे यावेळी सांगण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande