सोलापूर जिल्हा कारागृहातील महिला कैद्यांना सॅनिटरी पॅडचे वाटप
सोलापूर, 15 ऑगस्ट (हिं.स.)। सामाजिक बांधीलकी जपण्याच्या उद्देशाने ‘वाव’ या सामाजिक संस्थेच्या वतीने सोलापूर जिल्हा कारागृहातील महिला कैद्यांसाठी विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमांतर्गत सर्व महिला कैद्यांना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले
grdf


सोलापूर, 15 ऑगस्ट (हिं.स.)। सामाजिक बांधीलकी जपण्याच्या उद्देशाने ‘वाव’ या सामाजिक संस्थेच्या वतीने सोलापूर जिल्हा कारागृहातील महिला कैद्यांसाठी विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला.

या उपक्रमांतर्गत सर्व महिला कैद्यांना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. यासोबतच मासिक पाळीतील स्वच्छता आणि आरोग्यविषयक काळजीबाबत समुपदेशन करण्यात आले. कारागृह अधीक्षक सुशील कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि वरिष्ठ जेलर बिरू खेळबुटे यांच्या सहकार्याने हा उपक्रम पार पडला. यावेळी संस्थेच्या प्रतिनिधींनी महिला कैद्यांशी संवाद साधून मासिक पाळीदरम्यान वैयक्तिक स्वच्छता राखण्याचे महत्त्व, आरोग्याची काळजी आणि आवश्यक दक्षतेबाबत मार्गदर्शन केले.

या उपक्रमासाठी ‘वाव’ संस्थेच्या संस्थापिका विद्या लोलगे यांच्यासह सायरा शेख, मारता असादे, पुष्पा हलकुडे, गौरा कोरे, कांचन चौगुले, लक्ष्मी माने आणि वैशाली देशपांडे यांनी सोलापूर जिल्हा कारागृहाला भेट देऊन प्रत्यक्ष सॅनिटरी पॅडचे वाटप केले. संस्थेच्या या संवेदनशील उपक्रमामुळे कारागृहातील महिला कैद्यांना आवश्यक आरोग्यविषयक साहित्य उपलब्ध झाले. उपक्रमाच्या शेवटी महिला कैद्यांनी ‘वाव’ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande