लातूर - भाजपची काँग्रेस भवनासमोर आंदोलन करण्याची घोषणा
लातूर, 16 ऑगस्ट (हिं.स.)। भाजपची काँग्रेस भवनासमोर आंदोलन करण्याची घोषणा केल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपच्या आंदोलनाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्तेही सज्ज झाल्याने दोन्ही पक्षांमध्ये आमनेसामने संघर्ष होण्
आंदोलन


लातूर, 16 ऑगस्ट (हिं.स.)। भाजपची काँग्रेस भवनासमोर आंदोलन करण्याची घोषणा केल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपच्या आंदोलनाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्तेही सज्ज झाल्याने दोन्ही पक्षांमध्ये आमनेसामने संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संभाव्य तणावाच्या पार्श्वभूमीवर गांधी चौक व परिसरात पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस फौज तैनात करण्यात आली असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande