
लातूर, 16 ऑगस्ट (हिं.स.)। स्वातंत्र्यदिनानिमित्त काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमादरम्यान ‘वंदे मातरम्’चे गायन सुरू असताना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून अवमान करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत लातूर जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) वतीने काँग्रेस भवन परिसरात निषेध आंदोलन करण्यात आले.
भाजयुमोच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या कथित घटनेचा निषेध नोंदवत काँग्रेसविरोधात घोषणाबाजी केली. राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर गीतांचा सन्मान राखला पाहिजे, अशी भूमिका यावेळी कार्यकर्त्यांनी मांडली.
दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस भवन परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली.
या निषेध आंदोलनात भाजयुमोचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis