विलास घुले यांना न्याय मिळवून देण्यासाठी २१ ऑगस्टला बीडमध्ये भव्य मोर्चा
बीड, 16 ऑगस्ट (हिं.स.)। स्व. विलास नवनाथ घुले यांच्या हत्या प्रकरणातील उर्वरित आरोपींना अटक करून त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, या मागणीसाठी बीड जिल्ह्यातून आवाज उठवला जात आहे. अन्यायाविरुद्ध संघर्ष अधिक तीव्र करण्यासाठी शुक्रवार, दि. २१
अ


बीड, 16 ऑगस्ट (हिं.स.)। स्व. विलास नवनाथ घुले यांच्या हत्या प्रकरणातील उर्वरित आरोपींना अटक करून त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, या मागणीसाठी बीड जिल्ह्यातून आवाज उठवला जात आहे. अन्यायाविरुद्ध संघर्ष अधिक तीव्र करण्यासाठी शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी बीड शहरात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा मोर्चा सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे पोहोचणार आहे. या मोर्चाच्या माध्यमातून विलास घुले हत्या प्रकरणातील उर्वरित आरोपींना तातडीने अटक करावी आणि घुले कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात येणार आहे.

“स्व. विलास नवनाथ घुले यांना न्याय मिळालाच पाहिजे,” असा निर्धार व्यक्त करत नागरिकांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “न्यायासाठी एकजूट होऊया, आवाज उठवूया” असा सं तू तू 5देश देत विलास घुले यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. या मोर्चाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अन्यायाविरुद्धचा आवाज बुलंद करावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande