कावड यात्रेने अमरावतीत भक्तिमय वातावरण; आ. रवि राणा यांची उपस्थिती
अमरावती, 16 ऑगस्ट (हिं.स.) श्रावण महिन्याच्या पावन पर्वानिमित्त शिवशक्ती धाम मित्र मंडळ, कल्याण नगर चौक यांच्या वतीने भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. सात पवित्र तीर्थस्थळांवरून आणलेल्या जलाने सजलेल्या कावडी घेऊन मोठ्या संख्येने शिवभक्तांनी ‘ह
कावड यात्रेने अमरावतीत भक्तिमय वातावरण; आ. रवि राणा यांची उपस्थिती


अमरावती, 16 ऑगस्ट (हिं.स.) श्रावण महिन्याच्या पावन पर्वानिमित्त शिवशक्ती धाम मित्र मंडळ, कल्याण नगर चौक यांच्या वतीने भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. सात पवित्र तीर्थस्थळांवरून आणलेल्या जलाने सजलेल्या कावडी घेऊन मोठ्या संख्येने शिवभक्तांनी ‘हर हर महादेव’ आणि ‘जय भोलेनाथ’च्या जयघोषात कावड यात्रा काढली.

महाराष्ट्र विधानसभा आश्वासन समितीचे अध्यक्ष तथा आमदार रवि राणा यांनी यात्रेला सदिच्छा भेट देत कावडधारी भाविकांचा उत्साह वाढविला. त्यांनी भाविकांशी संवाद साधून भगवान महादेवांचे दर्शन व आशीर्वाद घेतले.

यावेळी आ. राणा म्हणाले की, श्रावणातील कावड यात्रा ही श्रद्धा, भक्ती आणि भगवान महादेवावरील अढळ विश्वासाचे प्रतीक आहे. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने अमरावतीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, समाजात एकता, सद्भावना आणि सकारात्मक ऊर्जा वाढावी, हीच महादेव चरणी प्रार्थना असल्याचे त्यांनी सांगितले.

यात्रेत श्री महाकाली माता शक्तीपीठाचे पीठाधीश्वर श्री शक्ती महाराज, शिक्षण सभापती अॅड. प्रिती रेवने यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, आयोजक व मोठ्या संख्येने शिवभक्त सहभागी झाले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande