रत्नागिरी : सोमवारी मुरादपूर ते मार्लेश्वर पायी दिंडी
रत्नागिरी, 16 ऑगस्ट (हिं.स.) । मुरादपूर (ता. संगमेश्वर) येथील श्रीमत भागवत नाम सांप्रदाय मंडळ आणि संगमेश्वर तालुका वारकरी सांप्रदायाच्या संयुक्त विद्यमाने मुरादपूर ते श्री क्षेत्र मार्लेश्वर अशी पायी दिंडी सोमवारी, दि. १७ ऑगस्ट रोजी काढण्यात येणार
रत्नागिरी : सोमवारी मुरादपूर ते मार्लेश्वर पायी दिंडी


रत्नागिरी, 16 ऑगस्ट (हिं.स.) । मुरादपूर (ता. संगमेश्वर) येथील श्रीमत भागवत नाम सांप्रदाय मंडळ आणि संगमेश्वर तालुका वारकरी सांप्रदायाच्या संयुक्त विद्यमाने मुरादपूर ते श्री क्षेत्र मार्लेश्वर अशी पायी दिंडी सोमवारी, दि. १७ ऑगस्ट रोजी काढण्यात येणार आहे.

मुरादपूरच्या श्री राधाकृष्ण मंदिरापासून सकाळी ६ वाजता दिंडीला सुरुवात होणार आहे. श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे दिंडीचे प्रस्थान होणार असून या धार्मिक सोहळ्यात संगमेश्वर तालुक्यातील आबालवृद्ध, महिला, वारकरी तसेच भाविक-भक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

परंपरा, भक्ती आणि वारकरी सांप्रदायाची पताका उंचावत निघणाऱ्या या पायी दिंडीमध्ये हरिनामाचा गजर, भजन-कीर्तन आणि भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळणार आहे. धार्मिक आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देणाऱ्या या दिंडी सोहळ्यात परिसरातील वारकरी, भाविक व भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक मंडळाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande