रत्नागिरी : भंडारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा ६ सप्टेंबरला राजापुरात गुणगौरव
रत्नागिरी, 16 ऑगस्ट (हिं.स.) । राजापूरच्या भंडारी हितवर्धक मंडळातर्फे राजापूर तालुक्यातील भंडारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता राजापूर हायस्कूलमध्ये करण्यात येणार आहे. या सोहळ्यामध्ये माध्यमिक, उच
रत्नागिरी : भंडारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा ६ सप्टेंबरला राजापुरात गुणगौरव


रत्नागिरी, 16 ऑगस्ट (हिं.स.) । राजापूरच्या भंडारी हितवर्धक मंडळातर्फे राजापूर तालुक्यातील भंडारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता राजापूर हायस्कूलमध्ये करण्यात येणार आहे.

या सोहळ्यामध्ये माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवीधर तसेच विविध क्षेत्रांत विशेष प्रावीण्य मिळविलेल्या भंडारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व विशेष कामगिरीचे कौतुक करून त्यांच्या यशाला प्रोत्साहन देणे, तसेच समाजातील इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.

राजापूर तालुक्यातील भंडारी समाजातील पात्र गुणवंत विद्यार्थ्यांनी तसेच त्यांच्या पालकांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन भंडारी हितवर्धक मंडळाच्या अध्यक्षा अनामिका जाधव यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande