
बीड, 16 ऑगस्ट (हिं.स.)।
प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी गेवराई शहरातील टिपरेप्रेमी आणि लोककलावंतांसाठी, 'शारदा प्रतिष्ठान, गेवराई'च्या माध्यमातून ' टिपरे महोत्सव २०२६' चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या पारंपारिक लोककलेचा जागर करण्यासाठी आणि या स्पर्धेत बहुसंख्येने सहभागी व्हावे.
या महोत्सवात टिपरे स्पर्धा (सांघिक), उत्कृष्ट पात्र सजावट (टिपरे), उत्कृष्ट सोंग कलावंत, उत्कृष्ट वाद्य वादक आणि भोलिबा गीत व नृत्य स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कमेसह, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
गेवराई तालुक्यातील महिलांसाठी विशेष 'भोलिबा (फेर) गीत व नृत्य स्पर्धा'आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या महिला स्पर्धकांनी आपल्या सादरीकरणाचा ३ मिनिटांचा व्हिडीओ स्वतःचे नाव व पत्त्यासह ७७१९९३३६३३ या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवणे आवश्यक आहे.
'टिपरे महोत्सव २०२६'
दिनांक: मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
वेळ: सायंकाळी ६.०० ते रात्री ९.३० वाजेपर्यंत
स्थळ: बाजार तळ, गेवराई
नोंदणीसाठी संपर्क:
प्रा. बाबु वादे - ७५८८६३५११२
श्री. ओम मोटे - ९४२०८७४५७८
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis