सिल्लोड शहरातील प्रभाग क्र. १, २ व ३ मध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 16 ऑगस्ट (हिं.स.)। सिल्लोड नगरपरिषदेच्या वतीने शहरातील प्रभाग क्रमांक १, २ व ३ मध्ये आमदार अब्दुल सत्तार यांनी विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण केले. यामध्ये श्रीकृष्ण मंदिर ते प्रवीण कारले यांच्या घराकडे जाणा
अ


छत्रपती संभाजीनगर, 16 ऑगस्ट (हिं.स.)। सिल्लोड नगरपरिषदेच्या वतीने शहरातील प्रभाग क्रमांक १, २ व ३ मध्ये आमदार अब्दुल सत्तार यांनी विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण केले.

यामध्ये श्रीकृष्ण मंदिर ते प्रवीण कारले यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन, रामकृष्ण विद्यालय ते अनिल नैनाव यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याचे लोकार्पण, तसेच आनंद पार्क येथील रस्ता विकासकामाचे भूमिपूजन करण्यात आले.

या विकासकामांमुळे संबंधित भागातील नागरिकांची दळणवळणाची सुविधा अधिक सुकर होणार असून, शहराच्या विकासाला आणखी गती मिळणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अब्दुल समीर होते. यावेळी जि.प. सदस्य देविदास पालोदकर, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, नॅशनल सहकारी सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन नरेंद्र (बापू) पाटील, नगरसेवक सिद्धेश्वर आहेर, सुधाकर गायकवाड, सुनील दुधे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी किशोर अग्रवाल, सुदर्शन अग्रवाल, राजेंद्र ठोंबरे, शंकरराव खांडवे, सयाजीराव वाघ, विनोद मंडलेचा, मनोज झंवर, शेख जावेद, दुर्गाबाई पवार, शकुंतलाबाई बन्सोड, विजय खाजेकर, प्रवीण मिरकर, स्वप्निल शेळके, प्रमोद शिंदे, महेंद्र चौधरी, गजानन ढेपले आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande