परभणी - श्री संत हरिबाबा महाराज ठाकुरबुवा लोहगावकर यांच्या मंदिराच्या सभामंडप जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ
परभणी, 16 ऑगस्ट (हिं.स.)। श्री संत हरिबाबा महाराज ठाकुरबुवा लोहगावकर यांच्या मंदिराच्या सभामंडप जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ ठाकूर बुवा परिवारातील सदस्य व गावकऱ्यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या सभामंडप जीर्णोद्धाराचे संपूर्ण काम स्वखर्चातून कर
अ


परभणी, 16 ऑगस्ट (हिं.स.)।

श्री संत हरिबाबा महाराज ठाकुरबुवा लोहगावकर यांच्या मंदिराच्या सभामंडप जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ ठाकूर बुवा परिवारातील सदस्य व गावकऱ्यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या सभामंडप जीर्णोद्धाराचे संपूर्ण काम स्वखर्चातून करण्यात येणार आहे, ही माझ्यासाठी केवळ जबाबदारी नसून संतसेवेची आणि समाजसेवेची एक पवित्र संधी आहे.

संतांच्या विचारांना आणि संस्कारांना पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या या पवित्र स्थळाच्या विकासासाठी योगदान देता येणे, ही माझ्यासाठी मनस्वी समाधानाची बाब आहे. संतांच्या चरणी केलेली सेवा हीच खरी ईश्वरसेवा या भावनेतून हे कार्य पूर्णत्वास नेण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील.

यावेळी ह.भ.प. ठाकुरबुवा परिवार यांच्यासह गावकरी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते...!

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande