
स्वतंत्र औद्योगिक टाऊनशिप'च्या मागणीने धरला जोर
नाशिक, 16 ऑगस्ट (हिं.स.)। अंबड औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची झालेली चाळण आणि प्रशासनाकडून होणारी घोर उपेक्षा यांविरोधात अखेर उद्योजकांचा संयम सुटला आहे. रस्ते दुरुस्तीच्या मागणीसाठी गेले वर्षभर 'आयमा' संघटनेच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करूनही महापालिकेने शून्य दखल घेतली.
अखेर संतापलेल्या उद्योजकांनी प्रशासनाचे डोळे रस्त्यांवरील उघडण्यासाठी खड्ड्यांमध्ये थेट वृक्षरोपण करून अनोखे आंदोलन छेडले. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन मनपा आयुक्त मनीषा खत्री आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी पाहणी करून रस्ते डागडुजीचे आश्वासन दिले होते मात्र, नऊ महिने उलटूनही प्रत्यक्षात एकही काम सुरू झालेले नाही आंदोलनात आयमाचे बीओपीपी चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे, उमेश कोठावदे, कॅप्टन बारिक, एन. डी. ठाकरे आणि दादा देशमुख यांच्यासह अनेक प्रमुख उद्योजक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI