
सोलापूर, 16 ऑगस्ट (हिं.स.)।
“मोहिते पाटलांचं नाव कसं पुसलं जाईल? प्रत्येक गल्ली-बोळ, रस्त्याला त्यांचं नाव आहे,” असे वक्तव्य करत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोहिते पाटील कुटुंबाच्या राजकीय आणि सामाजिक प्रभावावर भाष्य केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चेला नवे वळण मिळाले आहे.
पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात मोहिते पाटील कुटुंबाचा दीर्घकाळ प्रभाव राहिला आहे. या पार्श्वभूमीवर जयकुमार गोरे यांनी केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.मोहिते पाटील कुटुंबाचे राजकीय अस्तित्व आणि पश्चिम महाराष्ट्रातील त्यांचा प्रभाव याबाबत गोरेंच्या वक्तव्याने विविध राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. आगामी काळातील राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या वक्तव्याकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड