आंबेडकरी चळवळीतील अग्रणी व्यक्तिमत्त्व जोगेंद्र कवाडे आणि आमदार विटेकर यांची भेट
परभणी, 16 ऑगस्ट (हिं.स.)। पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ सामाजिक नेते तथा आंबेडकरी चळवळीतील अग्रणी व्यक्तिमत्त्व जोगेंद्र कवाडे कार्यक्रमाच्या निमित्ताने परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. सावली शासकीय विश्रामगृह, परभणी येथ
Q


परभणी, 16 ऑगस्ट (हिं.स.)।

पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ सामाजिक नेते तथा आंबेडकरी चळवळीतील अग्रणी व्यक्तिमत्त्व जोगेंद्र कवाडे

कार्यक्रमाच्या निमित्ताने परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले.

सावली शासकीय विश्रामगृह, परभणी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजेश विटेकर यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचे मनःपूर्वक स्वागत करून विविध सामाजिक व समकालीन विषयांवर स्नेहपूर्ण संवाद साधला.

मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनामध्ये कवाडे साहेबांचा लढाऊ आणि ऐतिहासिक सहभाग राहिला आहे. या आंदोलनादरम्यान त्यांनी काढलेल्या ऐतिहासिक लॉंगमार्चचे ते प्रणेते ठरले. सामाजिक न्याय, समता आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी त्यांनी सातत्याने दिलेला लढा निश्चितच प्रेरणादायी आहे.

जोगेंद्रजी कवाडे सोबत झालेली ही सदिच्छा भेव्ट‌ मनाला आनंद आणि ऊर्जा देणारी ठरली. वध

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande