नांदेड-कंधार शहर विकासाच्या दिशेने आणखी एक पाऊल!
नांदेड, 16 ऑगस्ट (हिं.स.)भारतीय संविधानाचे शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कंधार शहरातील पुतळा परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ झाला असून, संबंधित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत या विकासकामांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन ल
अ


नांदेड, 16 ऑगस्ट (हिं.स.)भारतीय संविधानाचे शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कंधार शहरातील पुतळा परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ झाला असून, संबंधित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत या विकासकामांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पाहणी केली. हा परिसर अत्यंत भव्य, सुंदर आणि प्रेरणादायी व्हावा यासाठी कामाचा दर्जा व गती याबाबत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.

या पाहणीदरम्यान कंधारचे उपविभागीय अधिकारी विलास नरवटे, तहसीलदार रामेश्वर गोरे, उपनगराध्यक्ष मन्नान चौधरी, सचिन पाटील चिखलीकर, मुख्याधिकारी संदीप भोळे, गटनेत्या सौ. अनुसयाताई केंद्रे, माजी उपनगराध्यक्ष जफरोद्दीन बाहोद्दीन, ॲड. पांचाळ, माजी उपनगराध्यक्ष जफरखान, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष किशनराव डफडे, PWD उपअभियंता आयतलवाड, नगरसेवक आसिफ शेख, समीर चाऊस, सुहास कांबळे, बाळासाहेब पवार, राजू केकाटे, मधु पाटील डांगे, माजी नगरसेवक शैलेश बोरलेपवार यांसह सर्व सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कंधार शहराच्या सौंदर्यीकरणासाठी आणि महामानवाच्या स्मारकाचा वारसा जपण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे आमदार चिखलीकर यांनी सांगितले विकासाचे हे प्रगतीचे पाऊल असल्याचे ते म्हणाले

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande