नांदेडमध्ये स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी आणि प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान - आमदार प्रताप पाटील चिखलीकर
नांदेड, 16 ऑगस्ट (हिं.स.)स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी आणि प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात येत असल्याचे लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितले कंधार
अ


नांदेड, 16 ऑगस्ट (हिं.स.)स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी आणि प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात येत असल्याचे लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितले कंधार येथील नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या सह दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नवीन इमारतीची प्रत्यक्ष पाहणी करून तेथील अडीअडचणी आमदार चिखलीकर यांनी जाणून घेतल्या.

हे अद्ययावत कार्यालय लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होणार असून, यामुळे सर्वसामान्य जनतेची कामे अधिक वेगाने आणि सोयीस्करपणे पूर्ण होण्यास मदत होईल. याचा उल्लेख त्यांनी केला. कंधार तालुक्याच्या विकासासाठी आणि जनतेला दर्जेदार सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे ते म्हणाले.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande