परभणी : राज्यमंत्री बोर्डीकर यांच्या हस्ते कृष्णा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन
परभणी, 16 ऑगस्ट (हिं.स.) | आरोग्य राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी परभणी येथील कृष्णा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन करून लोकार्पण केले. वसंतराव नाईक पुतळ्याजवळ, वसमत रोड येथे सुरू झालेल्या या रुग्णालय
अ


परभणी, 16 ऑगस्ट (हिं.स.) | आरोग्य राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी परभणी येथील कृष्णा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन करून लोकार्पण केले.

वसंतराव नाईक पुतळ्याजवळ, वसमत रोड येथे सुरू झालेल्या या रुग्णालयामुळे परभणीकरांना विविध वैद्यकीय उपचारांसाठी एक सक्षम आरोग्यसेवा केंद्र उपलब्ध होणार आहे. डॉ. संजय रोडगे , डॉ. सविता रोडगे, डॉ. गणेश पारवे, डॉ. आदित्य रोडगे आणि डॉ. अपूर्वा रोडगे -पारवे या डॉक्टरांच्या पुढाकारातून हा उपक्रम साकारला जात आहे. परभणी जिल्ह्यात दर्जेदार आणि आधुनिक आरोग्यसेवा अधिक सक्षम व्हावी, हीच अपेक्षा आणि कृष्णा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा लताताई वाकडे, महापौर सय्यद इकबाल, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सारिका पारवे आणि मनीषा जाधव यांची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande