परभणी : कुंभारी फाटा ते कुंभारी गाव रस्त्याच्या मजबुतीकरणाच्या महत्त्वपूर्ण कामाचा शुभारंभ
परभणी, 16 ऑगस्ट (हिं.स.)। कुंभारी फाटा ते कुंभारी गाव या रस्त्याच्या मजबुतीकरणाच्या महत्त्वपूर्ण कामाचा शुभारंभ आज पाथरी विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजेश विटेकर यांच्या हस्ते करण्यात आला. मदत व पुनर्वसन विभागामार्फत
Q


परभणी, 16 ऑगस्ट (हिं.स.)।

कुंभारी फाटा ते कुंभारी गाव या रस्त्याच्या मजबुतीकरणाच्या महत्त्वपूर्ण कामाचा शुभारंभ आज पाथरी विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजेश विटेकर यांच्या हस्ते करण्यात आला. मदत व पुनर्वसन विभागामार्फत हे काम करण्यात येत असून, या रस्त्यामुळे कुंभारी गावासह परिसरातील नागरिकांची वाहतूक अधिक सुलभ व सुरक्षित होण्यास निश्चितच मदत होणार आहे.

गावांच्या विकासासाठी सक्षम रस्ते व आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे ही आपली प्राथमिकता आहे. नागरिकांच्या दैनंदिन गरजा आणि स्थानिक विकास लक्षात घेऊन मतदारसंघातील विविध विकासकामांना गती देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य दत्तराव जाधव, शिवाजी वरखडे, विष्णू वरखडे, विठ्ठल चव्हाण, अशोक चव्हाण, काशिनाथ दरपडे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande