
लातूर, 16 ऑगस्ट (हिं.स.)।
दैठणा येथे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व दैठणा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण सोहळा संपन्न*
लोकनेते विलासराव देशमुख, माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर व माजी मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या दूरदृष्टीतून या भागातील शेतकरी समृद्ध झाला असून, सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सामान्य माणसाला आर्थिक सक्षम करण्याचे काम सातत्याने झाले आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही केवळ बँक नसून शेतकऱ्यांसाठी कल्पवृक्ष आहे, असे प्रतिपादन सहकारमहर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले ते लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा दैठणा येथील नूतन इमारतीत स्थलांतर तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, दैठणा (शेंद, उ.द.प.) यांच्या सुसज्ज नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ श उत्साहात पार पडला.त्यावेळी ते बोलत होते
यावेळी लातूर ग्रामीणचे माजी आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धीरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हनून खासदार डॉ शिवाजीराव काळगे राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील सेलूकर हे होते
*जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना मदत*
यावेळी बोलताना दिलीपराव देशमुख म्हणाले की, ग्रामीण भागातील सामान्य माणूस आणि शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा, या उद्देशाने सहकाराची चळवळ उभी राहिली. पूर्वी शेतकऱ्यांना खासगी सावकारांच्या दारात जावे लागत होते. सहकाराच्या माध्यमातून या परिस्थितीत बदल घडवून आणण्यात आला. जिल्हा बँकेने पारदर्शक कारभारातून देशात नावलौकिक मिळविला आहे.
धनेगाव धरणानंतर तत्कालीन नेतृत्वाने एकापाठोपाठ बंधारे उभारल्याने सिंचनाची सुविधा वाढली आणि परिसरातील शेतकरी सधन झाला. साखर कारखान्यांनीही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव देण्याची परंपरा कायम ठेवली. जिल्हा बँक शेतकऱ्यांना शेती, शेतीपूरक व्यवसाय, बचत गट, शिक्षण यांसह विविध गरजांसाठी कर्जपुरवठा करीत असून, बँक नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे.
*भूमिपुत्रांना रोजगार, पात्र लोकांना जिल्हा बँकेकडून कर्ज वाटपावर भर - धीरज देशमुख
बँकेचे चेअरमन धीरज विलासराव देशमुख म्हणाले की, दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारण बाजूला ठेवून समाजकारण व सहकाराच्या माध्यमातून काम करण्याची दिशा मिळाली. जिल्हा बँकेचा कारभार पारदर्शक असून, कर्जवाटप करताना राजकारण केले जात नाही. भूमिपुत्रांना रोजगार आणि पात्र लाभार्थ्यांना कर्ज देण्यावर भर दिला जात आहे. दैठणा परिसरातील शेतकऱ्यांमध्ये बँकिंग व सहकाराबाबत झालेल्या जनजागृतीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती झाली आहे.
आगामी काळात शेतीसोबत जोडधंदे, बचत गट व विविध व्यवसायांसाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. गावागावात बँकेच्या योजना पोहोचविण्यासाठी शाखांनी प्रभावी काम करावे. तसेच भविष्यात शाखा विस्तारासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही धीरज देशमुख यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis