
बीड, 16 ऑगस्ट (हिं.स.)।
शिवछत्र परिवाराच्या माध्यमातून गेवराई शहरातील सरस्वती कॉलनी क्र. २ येथे श्री ओंकारेश्वर मंदिराचे भव्य बांधकाम करण्यात आले आहे. दगडी वास्तुकलेचे हे सुंदर मंदिर गेवराई शहराच्या अध्यात्मिक क्षेत्रात नवा नावलौकिक निर्माण करणारे ठरणार आहे. हे मंदिर प्राणप्रतिष्ठेसाठी सज्ज झाले आहे.
माजी आमदार श्री. अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. विजेता आणि आ. विजयसिंह पंडित या दांपत्याच्या शुभहस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे.
श्रावणी सोमवार दिनांक १७ ऑगस्ट रोजी सकाळी विधीवत महादेव श्री ओंकारेश्वर मंदिरात प्रतिष्ठित होणार आहेत. या पवित्र सोहळ्यास सर्वांनी आपल्या परिवारासह आवर्जून उपस्थित राहून श्री ओंकारेश्वर महादेवाचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरस्वती कॉलनी क्र. २ मधील रहिवाशी मंडळाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis