आ. अब्दुल सत्तार यांनी जवळपास साडेसात किलोमीटर पायी चालत केली प्रत्यक्ष पाहणी
छत्रपती संभाजीनगर, 16 ऑगस्ट (हिं.स.)। सोयगाव तालुक्यातील रावळा ते पळासखेडा-टिटवी रस्त्याच्या कामाची वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आमदार अब्दुल सत्तार यांनी जवळपास साडेसात किलोमीटर पायी चालत प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढाव
अ


छत्रपती संभाजीनगर, 16 ऑगस्ट (हिं.स.)। सोयगाव तालुक्यातील रावळा ते पळासखेडा-टिटवी रस्त्याच्या कामाची वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आमदार अब्दुल सत्तार यांनी जवळपास साडेसात किलोमीटर पायी चालत प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला.

प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सीमांकनाच्या आतील रस्त्यासाठी अडथळा ठरणाऱ्या वृक्षतोडी व साफसफाईच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या.

यावेळी बोलताना आमदार सत्तार म्हणाले, या रस्त्यासाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता.अखेर २० फेब्रुवारी २०२३ रोजी रस्त्याच्या पहिल्या टप्प्यातील कामाला परवानगी मिळाली. त्यानंतर भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण करून सीमांकन करण्यात आले असून, आता सीमांकनाच्या आतील वृक्षतोड करून रस्ता तयार करण्यासाठी काम सुरू आहे.

अनेक वर्षांची नागरिकांची मागणी आता पूर्णत्वास येत असून, या रस्त्यामुळे परिसरातील गावांचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

यावेळी जामनेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी सूरज आवारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता ब्रह्मानंद तायडे, कनिष्ठ अभियंता प्रमोद राठोड, वनपाल समाधान धनवट, वनरक्षक कुणाल जाधव यांच्यासह शिवसेना तालुकाप्रमुख धरमसिंग चव्हाण, सांडू तडवी, जि.प. सदस्य देविदास पालोदकर, शिवप्पा चोपडे आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande