
परभणी, 16 ऑगस्ट (हिं.स.)।
स्वामी दिव्यानंद चैतन्य महाराज यांच्या जन्मशताब्दी निमित्त श्रीक्षेत्र आंध्रवाडा, मारुती मंदिर, मानवत शहरातील प्रभाग क्र. एक येथे अंदरवाडा मारुतीचे आमदार राजेश विटेकर यांनी मनोभावे दर्शन घेतले. या पवित्र आणि भक्तिमय स्थळी येऊन मनाला लाभलेली आध्यात्मिक ऊर्जा, समाधान लाभले.
यावेळी स्वामी मनीषानंद पुरीजी महाराज यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. संत - महंतांच्या सान्निध्यातून मिळणारे अध्यात्मिक मार्गदर्शन आणि सकारात्मक ऊर्जा समाजाला सदैव प्रेरणा देणारी असते.
या पवित्र मंदिराच्या सभामंडप बांधकाम व सुशोभीकरणासाठी शासन स्तरावर आवश्यक ते प्रयत्न करून सहकार्य करण्याचे यावेळी आमदार विटेकर यांनी आवर्जून सांगितले. भक्ती, अध्यात्म आणि समाजसेवेचा हा पवित्र संगम पुढील पिढ्यांसाठीही प्रेरणादायी ठरो, हीच श्री मारुती चरणी प्रार्थना!
यावेळी मानवत नगरीचे नगराध्यक्ष डॉ. अंकुश लाड, नगरसेवक दत्ता चौधरी, मोहनराव लाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis