लातूर - देवणीत सोमवारी खा. डॉ. शिवाजी काळगे यांचा जनता दरबार
लातूर, 16 ऑगस्ट, (हिं.स.)। शिरूर अनंतपाळ येथील जनता दरबाराच्या यशानंतर खासदार डॉ. शिवाजी काळगे यांचा जनता दरबार उद्या, १७ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता देवणी तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. आ. अमित देशमुख यांच्या सूचनेनुसार व लातूर जिल्हा काँग
खासदार काळगे


लातूर, 16 ऑगस्ट, (हिं.स.)। शिरूर अनंतपाळ येथील जनता दरबाराच्या यशानंतर खासदार डॉ. शिवाजी काळगे यांचा जनता दरबार उद्या, १७ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता देवणी तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. आ. अमित देशमुख यांच्या सूचनेनुसार व लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके यांच्या पुढाकारातून ही मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिक, शेतकरी व महिलांच्या प्रशासकीय समस्या थेट ऐकून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांसमोर त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande