रायगड - दुर्गम भागातील आरोग्यसेवेला मोठी चालना; आंबिवलीत प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन
रायगड, 16 ऑगस्ट (हिं.स.)। कर्जत तालुक्यातील आंबिवली-खांदन येथे सार्वजनिक आरोग्य विभाग आणि आदिवासी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचे लोकार्पण स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट रोजी
### आंबिवलीत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचे लोकार्पण  **कर्जत :** कर्जत तालुक्यातील आंबिवली-खांदन येथे सार्वजनिक आरोग्य विभाग आणि आदिवासी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचे लोकार्पण स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट रोजी उत्साहात करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या इमारतीचे लोकार्पण झाले. यावेळी कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे उपस्थित होते.  आदिवासी उपाययोजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या या आरोग्य केंद्रामुळे आंबिवली, खांदन, मोगरज आणि परिसरातील २० हजारांहून अधिक ग्रामीण व आदिवासी नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन गुरव यांच्या माहितीनुसार, कर्जत तालुक्याची एकूण लोकसंख्या २ लाख ५ हजार ६४९ असून तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ३९ उपकेंद्रे कार्यरत आहेत.  आंबिवली प्राथमिक आरोग्य केंद्र हे नवसंजीवनी कार्यक्षेत्रातील केंद्र असून त्याअंतर्गत २० हजार ५३८ लोकसंख्या समाविष्ट आहे. केंद्राच्या कार्यक्षेत्रात आठ उपकेंद्रे असून मोगरज येथे नवसंजीवनीचे एक भरारी पथक कार्यरत आहे. दुर्गम भागातील नागरिकांना तातडीच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी दोन मोबाईल मेडिकल युनिटद्वारेही सेवा पुरविण्यात येत आहे.  उद्घाटन सोहळ्यास समाज कल्याण सभापती नारायण डामसे, सभापती नमिता घारे, उपसभापती चित्र ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य शेळके, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, प्रसाद थोरवे, जिल्हाधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन गुरव तसेच मोगरज ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.  या नवीन इमारतीमुळे माता-बाल आरोग्य, लसीकरण, कुटुंब कल्याण तसेच विविध राष्ट्रीय आरोग्य उपक्रमांना अधिक गती मिळणार आहे. दुर्गम आदिवासी व ग्रामीण भागातील नागरिकांना स्थानिक पातळीवर आरोग्यसेवा उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.


रायगड, 16 ऑगस्ट (हिं.स.)। कर्जत तालुक्यातील आंबिवली-खांदन येथे सार्वजनिक आरोग्य विभाग आणि आदिवासी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचे लोकार्पण स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट रोजी उत्साहात करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या इमारतीचे लोकार्पण झाले. यावेळी कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे उपस्थित होते.

आदिवासी उपाययोजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या या आरोग्य केंद्रामुळे आंबिवली, खांदन, मोगरज आणि परिसरातील २० हजारांहून अधिक ग्रामीण व आदिवासी नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन गुरव यांच्या माहितीनुसार, कर्जत तालुक्याची एकूण लोकसंख्या २ लाख ५ हजार ६४९ असून तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ३९ उपकेंद्रे कार्यरत आहेत.

आंबिवली प्राथमिक आरोग्य केंद्र हे नवसंजीवनी कार्यक्षेत्रातील केंद्र असून त्याअंतर्गत २० हजार ५३८ लोकसंख्या समाविष्ट आहे. केंद्राच्या कार्यक्षेत्रात आठ उपकेंद्रे असून मोगरज येथे नवसंजीवनीचे एक भरारी पथक कार्यरत आहे. दुर्गम भागातील नागरिकांना तातडीच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी दोन मोबाईल मेडिकल युनिटद्वारेही सेवा पुरविण्यात येत आहे.

उद्घाटन सोहळ्यास समाज कल्याण सभापती नारायण डामसे, सभापती नमिता घारे, उपसभापती चित्र ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य शेळके, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, प्रसाद थोरवे, जिल्हाधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन गुरव तसेच मोगरज ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या नवीन इमारतीमुळे माता-बाल आरोग्य, लसीकरण, कुटुंब कल्याण तसेच विविध राष्ट्रीय आरोग्य उपक्रमांना अधिक गती मिळणार आहे. दुर्गम आदिवासी व ग्रामीण भागातील नागरिकांना स्थानिक पातळीवर आरोग्यसेवा उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande