शाश्वत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनास खा.काळे यांची भेट
छत्रपती संभाजीनगर, 16 ऑगस्ट (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर येथे श्री. राजेंद्र दाते पाटील यांनी शाश्वत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनास आज खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी भेट दिली. यावेळी बोलताना खासदार डॉक्टर कल्याण काळे
Q


छत्रपती संभाजीनगर, 16 ऑगस्ट (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर येथे श्री. राजेंद्र दाते पाटील यांनी शाश्वत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनास आज खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी भेट दिली.

यावेळी बोलताना खासदार डॉक्टर कल्याण काळे म्हणाले की,

आंदोलकांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या व भूमिका जाणून घेतल्या आणि या आंदोलनाला माझा पाठिंबा व्यक्त केला. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील मागण्यांबाबत शासनस्तरावर आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासन यावेळी दिले.

श्री. राजेंद्र दाते पाटील यांच्या प्रकृतीची काळजी असून, त्यांचे आरोग्य उत्तम राहावे, ही ईश्वरचरणी प्रार्थना.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande