
नाशिक, 16 ऑगस्ट (हिं.स.)। ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताचा अवमान केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चा, नाशिक महानगरच्या वतीने रविवारी (दि. १६ ऑगस्ट) पंचवटी कारंजा येथे भरपावसात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी सामूहिकरीत्या संपूर्ण ‘वंदे मातरम्’चे गायन करत काँग्रेसच्या भूमिकेचा निषेध नोंदविला.
हे आंदोलन भाजपा नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार आणि भाजयुमो नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष प्रवीण भाटे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. राष्ट्रगीताचा सन्मान आणि राष्ट्रप्रेमाची भावना अधोरेखित करत मोठ्या संख्येने कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. भरपावसातही कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
यावेळी भाजयुमो नाशिक महानगरचे सरचिटणीस प्रशांत वाघ, निखिल खोड़े, पवन उगले, गणेश पिंगळे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्वाती भामरे, मंडलाध्यक्ष गौरव बोडके, पवन गुरव, युवा मोर्चाचे मंडल अध्यक्ष प्रणित सानप यांच्यासह अजिंक्य पगारे, संगीता जाधव, हर्ष पाटील, केदार सोननणे, अक्षय दोंदे, अशोक ठोंबरे, निखिल सुतार, निखिल अडसुळे, संतोष कांबळे, परी गिरासे, कल्पना दुशिंग, संगीता पाटील, यमुना लिंगायत, संगीता राणे, प्रमिला वाणी, निशा क्षीरसागर, बबन ढगे, शरद काकड, तुषार नाटकर, ऋषिकेश पाटील, ललित ओहोळ, मिहीर हजारे, विकास एखंडे, रोहन कानकाटे, हर्षद बुचडे, निखिल चौधरी, सूरज निकम, तेजस वाघ, अक्षय गांधी, अभिनय यादव, किरण लहाने, विशाल उपाध्येय, कुंदन जावरे, राहुल कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आंदोलनादरम्यान ‘वंदे मातरम्’ आणि ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी पंचवटी कारंजा परिसर दुमदुमून गेला. भरपावसात झालेल्या या आंदोलनामुळे परिसरात काही काळ राजकीय वातावरण तापले होते.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI