राष्ट्रवादी काँग्रेस (शप)ची बीड जिल्ह्याची संघटनात्मक बैठक संपन्न
बीड, 16 ऑगस्ट (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश कार्यालय येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार पद्मविभूषण शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा ‘महासंसदरत्न’ खासदार सुप्रिया सुळे, प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रोहित पवार या
अ


बीड, 16 ऑगस्ट (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश कार्यालय येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार पद्मविभूषण शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा ‘महासंसदरत्न’ खासदार सुप्रिया सुळे, प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील प्रदेश कार्यालयात बीड जिल्ह्याची संघटनात्मक बैठक संपन्न झाली.

यावेळी बीड जिल्ह्यातील पक्षसंघटनेच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आगामी काळातील संघटनात्मक नियोजन, पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तसेच जिल्ह्यातील विविध स्थानिक प्रश्न व जनतेच्या अडचणी यावर सखोल चर्चा करण्यात आली. शरदचंद्र पवार, सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार रोहित पवार तसेच बीड जिल्हा निरीक्षक जीवनराव गोरे यांनी जिल्ह्यातील संघटनात्मक परिस्थिती जाणून घेत मार्गदर्शन केले. जनतेच्या प्रश्नांवर पक्षाची भूमिका अधिक प्रभावीपणे मांडत, आगामी काळात संघटनात्मक ताकद वाढवून जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आवश्यक सूचना करण्यात आल्या. बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम करून जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.

-------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande