पारधी समाजाच्या सुमन काळे हत्या प्रकरणात नव्याने एसआयटी गठित
मुंबई, १६ ऑगस्ट (हिं.स.) : अहिल्यानगर येथील पारधी समाजातील सुमन काळे यांच्या सन २००७ मधील संशयास्पद पोलिस कोठडीतील मृत्यू प्रकरणाला अखेर नव्याने तपासाची दिशा मिळाली आहे. विवेक विचार मंचाचे राज्य सहयोजक प्रा. सागर शिंदे यांनी या प्रकरणाबाबत अनुसूच
पारधी समाजाच्या सुमन काळे हत्या प्रकरणात नव्याने एसआयटी गठित


मुंबई, १६ ऑगस्ट (हिं.स.) : अहिल्यानगर येथील पारधी समाजातील सुमन काळे यांच्या सन २००७ मधील संशयास्पद पोलिस कोठडीतील मृत्यू प्रकरणाला अखेर नव्याने तपासाची दिशा मिळाली आहे.

विवेक विचार मंचाचे राज्य सहयोजक प्रा. सागर शिंदे यांनी या प्रकरणाबाबत अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे तक्रार करून सातत्याने पाठपुरावा केला. आयोगाने या तक्रारीची गंभीर दखल घेतली.

आयोगाचे तत्कालिन उपाध्यक्ष अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी प्रत्यक्ष अहिल्यानगर येथे दिनांक २३ मार्च २०२५ ला प्रत्यक्ष भेट देऊन, प्रकरण समजून घेत सीआयडी अधिकारी प्रशासकीय बैठक घेत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

या प्रकरणाला विधानसभेतही आवाज मिळाला. श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून सुमन काळे मृत्यू प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथक (SIT) मार्फत करण्याची मागणी केली. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानसभेत शासनाची भूमिका स्पष्ट करत या प्रकरणाच्या चौकशीबाबत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मार्गदर्शन घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.

त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या गंभीर प्रकरणाची संवेदनशीलतेने दखल घेत विशेष तपास पथक गठित करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार दि. १३ ऑगष्ट २०२६ ला विशेष तपास पथक (एसआयटी) गठित करत ३ महिन्यात पोलिस यंत्रणेला तपास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

वर्षानुवर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या सुमन काळे यांच्या कुटुंबासाठी ही कार्यवाही महत्त्वाची ठरली असून, स्वतंत्र व निष्पक्ष तपासातून सत्य समोर येऊन पीडित कुटुंबाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande