परभणीत राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक
परभणी, 16 ऑगस्ट (हिं.स.)। राज्याचे कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सावली शासकीय विश्रामगृह, परभणी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत
अ


परभणी, 16 ऑगस्ट (हिं.स.)।

राज्याचे कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सावली शासकीय विश्रामगृह, परभणी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजेश विटेकर यांनी उपस्थित राहून पक्षाच्या संघटनात्मक वाटचालीसह विविध जनहिताच्या प्रश्नांवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. दिवंगत उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला दिलेले भक्कम नेतृत्व, विकासाची दूरदृष्टी आणि जनसेवेची शिकवण सदैव आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी राहील. त्यांच्या विचारांना आणि कार्याला पुढे नेत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.

तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संघटनात्मक ताकद अधिक वाढवून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्य करण्याचा संकल्प केला. पक्षाच्या विचारधारेवर निष्ठा ठेवून प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने एकजुटीने आणि जोमाने काम करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande