जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाण्यात तीन दिवस भव्य छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन
ठाणे, 16 ऑगस्ट, (हिं.स.)। जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महापालिका मुख्यालयात तीन दिवस भव्य छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मह
जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाण्यात तीन दिवस भव्य छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन


ठाणे, 16 ऑगस्ट, (हिं.स.)। जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महापालिका मुख्यालयात तीन दिवस भव्य छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते सोमवार, १७ ऑगस्ट रोजी दुपारी होणार आहे.

पत्रकारितेच्या माध्यमातून ठाणे शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि विविध क्षेत्रांतील वैविध्यपूर्ण घडामोडी टिपणाऱ्या छायाचित्रकारांच्या कलाकृतींना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून हे भव्य प्रदर्शन ठाणे महापालिका मुख्यालयातील पहिल्या मजल्यावर होत आहे. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप शिंदे यांच्या पुढाकाराने आयोजित दि. १७ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभाला महापौर सौ. शर्मिला रोहित पिंपळोलकर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, आमदार संजय केळकर, आमदार अॅड. निरंजन डावखरे,आमदार राजेश मोरे, आमदार रविंद्र फाटक, आमदार अॅड. माधवी नाईक यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, नगरसेवक नारायण पवार, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, मिनल संख्ये तसेच महापालिका आयुक्त श्री. सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

या प्रदर्शनातून ठाणे शहराच्या विविध पैलूंचे दर्शन घडणार आहे. त्यामुळे ठाणेकरांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन छायाचित्रकारांच्या कला अविष्काराला दाद द्यावी, असे आवाहन ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande