रत्नागिरी : मृद व जलसंवर्धनासाठी रील फॉर सॉइल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन स्पर्धा
रत्नागिरी, 16 ऑगस्ट (हिं.स.) । मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या जलसंधारण सप्ताहादरम्यान राज्यातील सर्व जिल्ह्यांत मृद् व जलसंवर्धन रील्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील १५ ते ३० वयोगटातील युवक-युवतींच्या कल्पक
रील्स स्पर्धा


रत्नागिरी, 16 ऑगस्ट (हिं.स.) । मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या जलसंधारण सप्ताहादरम्यान राज्यातील सर्व जिल्ह्यांत मृद् व जलसंवर्धन रील्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील १५ ते ३० वयोगटातील युवक-युवतींच्या कल्पकतेचा उपयोग करून इन्स्टाग्राम (Instagram) च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मृद् व जलसंधारणाबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्यव्यापी रील फॉर सॉइल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या रील स्पर्धेत राज्यातील युवक - युवतींनी उत्स्फूर्तपणे सहभागी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

रील स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरावर आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेचा पात्र वयोगट १५ ते ३० वर्षे असा आहे. प्रत्येक स्पर्धकाने ३० ते ६० सेकंदांची Instagram Reel तयार करावी. व्हिडीओ/ रीलच्या सुरुवातीला व्हिडीओ / रीलचा उद्देश, स्वतःचे संपूर्ण नाव, जिल्ह्याचे नाव सहभागी स्पर्धकांनी देणे आवश्यक आहे. स्पर्धाकाने Reel स्वतःच्या Public Instagram Account वर पोस्ट करावी. स्पर्धकाने मृद् व जलसंधारण विभागाच्या अधिकृत Instagram Account ला Tag करणे बंधनकारक राहील. यासाठी अधिकृत हॅशटॅग #Save Soil Save Water वापरणे अनिवार्य आहे.

रील्स बनवण्यासाठी माती संवर्धन, पाणी बचत, मृद्संधारण, जलसंधारण, मातीची धूप रोखणे, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, गावातील यशस्वी मृद् व जलसंधारण कामे, पारंपरिक मृद् व जलसंधारण पद्धती, माती व पाणी वाचविण्याच्या नावीन्यपूर्ण कल्पना, आजचे संवर्धन उद्याचे सुरक्षित भविष्य असे रील्स बनवण्यासाठी विषय देण्यात आले आहेत.

रील्सकरिता गुणांकन पद्धती अशी असेल - विषय व संदेश - ३० गुण, कल्पकता -२५ गुण, प्रभावी सामाजिक संदेश - २० गुण, सादरीकरण व तांत्रिक गुणवत्ता - १५ गुण, Instagram Engagement - १० गुण असे एकूण - १०० गुण असणार आहेत. केवळ Likes किंवा Followers वर विजेता निश्चित न करता तज्ज्ञ परीक्षण आणि Social Media Engagement या दोन्हींचा समतोल ठेवण्यात येणार आहे. गुणांकानुसार विजेत्याची निवड करण्यात येईल.

राज्यासाठी एकच अधिकृत हॅशटॅग #SaveSoilSaveWater वापरण्यात येणार असून, प्रत्येक जिल्ह्यातून किमान २५० रील्स आणि राज्यभरातून १० हजार रील्सचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या माध्यमातून लाखो नागरिकांपर्यंत डिजिटल स्वरूपात मृद् व जलसंधारणाचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. स्पर्धेत प्रत्येक जिल्ह्यात अनुक्रमे २५ हजार, १५ हजार आणि १० हजार रुपयांची पहिली तीन पारितोषिके आणि गौरवचिन्ह दिले जाईल. पात्र सहभागींना ई-प्रमाणपत्र तसेच विजेत्यांना विशेष युवा मृद्-जलदूत म्हणून गौरविण्यात येणार आहे.

एक Reel... मातीसाठी !, एक Reel... पाण्यासाठी !, एक Reel... सुरक्षित भविष्यासाठी ! हा रील्स प्रचारासाठी मुख्य संदेश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande