रत्नागिरी : खेर्डी चिंचघरी सती शाळेत रोबोटिक एआय लॅबचे उद्घाटन
रत्नागिरी, 16 ऑगस्ट, (हिं.स.) । खेर्डी चिंचघरी-सती (ता. चिपळूण) येथील धोंडीराम शेठ दाभोळकर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान व प्रत्यक्ष अनुभव मिळावा, तसेच त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा आणि सर्जनशील
रत्नागिरी : खेर्डी चिंचघरी सती शाळेत रोबोटिक एआय लॅबचे उद्घाटन


रत्नागिरी, 16 ऑगस्ट, (हिं.स.) । खेर्डी चिंचघरी-सती (ता. चिपळूण) येथील धोंडीराम शेठ दाभोळकर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान व प्रत्यक्ष अनुभव मिळावा, तसेच त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा आणि सर्जनशीलता विकसित व्हावी, या उद्देशाने रोबोटिक एआय लॅब सुरू करण्यात आली.

लॅबचे उद्घाटन सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा आमदार शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष तयार करण्यात आलेल्या रोबोटच्या माध्यमातून फीत कापून आणि श्रीफळ वाढवून उद्घाटन झाले. सह्याद्री शिक्षण संस्थेचे संस्थापक स्व. गोविंदरावजी निकम व स्व. अनुराधाताई निकम तसेच सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.

रोबोटिक लॅबच्या माध्यमातून रोबोटिक्स, विज्ञान, संगणक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवोपक्रमाची ओळख होणार आहे. प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार असून, त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळण्याबरोबरच समस्या सोडविण्याची क्षमता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होईल, असे मुख्याध्यापक अरविंद सकपाळ यांनी प्रास्ताविकात सांगितले.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मुख्याध्यापक अरविंद सकपाळ, इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका समीक्षा पिटले, शिशुविहारच्या मुख्याध्यापिका ममता ठसाळे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande