परभणी जिल्ह्यातील असंख्य नागरिकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
परभणी, गंगाखेड परिसरात संघटनात्मक ताकद वाढली; विकासाला गती देण्याचा निर्धार परभणी, 16 ऑगस्ट (हिं.स.)। गंगाखेड, दैठणा, लिंबा, फुलरवाडी, जवळा झुटा व वडी परिसरातील असंख्य नागरिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विकासा
अ


परभणी, गंगाखेड परिसरात संघटनात्मक ताकद वाढली; विकासाला गती देण्याचा निर्धार

परभणी, 16 ऑगस्ट (हिं.स.)। गंगाखेड, दैठणा, लिंबा, फुलरवाडी, जवळा झुटा व वडी परिसरातील असंख्य नागरिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विकासाभिमुख व लोककल्याणकारी नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना आमदार सईद खान यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा हा सोहळा उत्साहात पार पडला.

नव्या सहकाऱ्यांच्या पक्षप्रवेशामुळे संबंधित परिसरातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम झाली आहे. जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासकामांना गती देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेच्या कार्याला नवी ऊर्जा मिळाली असून, जनतेच्या विश्वासाच्या बळावर विकासाची वाटचाल अधिक जोमाने पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला. आगामी काळात सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच परिसराच्या विकासासाठी सक्रियपणे काम करण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली. या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या सहकाऱ्यांच्या सहभागामुळे परिसरात शिवसेनेच्या संघटनात्मक विस्ताराला आणखी बळ मिळाल्याचे चित्र दिसून आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande