
छत्रपती संभाजीनगर, 16 ऑगस्ट (हिं.स.)।
पैठण शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १२.५ फूट उंचीच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. पैठण तालुक्यातील मातंग समाजबांधवांची अनेक वर्षांची मागणी आज पूर्णत्वास आली, हा सर्वांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. असे खासदार संदिपान भुमरे यांनी सांगितले ते म्हणाले आपल्या संकल्पनेतून साकारलेली ही संकल्पना शिल्पकार नरेंद्र सोळुंके यांनी जवळपास वर्षभराच्या अथक परिश्रमातून प्रत्यक्षात आणली. त्याबद्दल त्यांचे देखील अभिनंदन!
अण्णाभाऊंचा हा पुतळा केवळ एक स्मारक नाही, तर संघर्ष, स्वाभिमान, समता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचे प्रेरणास्थान आहे. त्यांच्या साहित्याचा आणि परिवर्तनवादी विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे, हीच अण्णाभाऊंना खरी आदरांजली ठरेल.
या निमित्ताने अण्णाभाऊंच्या विचारांचे जतन करण्यासोबतच परिसराच्या विकासासाठी आणि सामाजिक उपक्रमांना चालना देण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प करूया.
या ऐतिहासिक सोहळ्यास समाजबांधव, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis