आष्टी तालुक्यात ट्रॅक्टर उद्योग क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणून सावळेश्वर ट्रॅक्टर्सने निर्माण केली ओळख
बीड, 16 ऑगस्ट (हिं.स.)। आधुनिक तंत्रज्ञानासह शेतीतील विविध कामांसाठी उपयुक्त सुविधा देणारा Swaraj 855 FE Protek ट्रॅक्टर आष्टी येथील सावळेश्वर ट्रॅक्टर्स येथे दाखल झाला आहे. आमदार सुरेश धस यांनी ही माहिती दिली. सावळेश्वर ट्रॅक्टर्स येथे या नवीन ट्
अ


बीड, 16 ऑगस्ट (हिं.स.)। आधुनिक तंत्रज्ञानासह शेतीतील विविध कामांसाठी उपयुक्त सुविधा देणारा Swaraj 855 FE Protek ट्रॅक्टर आष्टी येथील सावळेश्वर ट्रॅक्टर्स येथे दाखल झाला आहे. आमदार सुरेश धस यांनी ही माहिती दिली.

सावळेश्वर ट्रॅक्टर्स येथे या नवीन ट्रॅक्टरच्या अनावरण सोहळ्याचा शुभारंभ भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या हस्ते शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.

आष्टी तालुक्यात ट्रॅक्टर उद्योग क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणून सावळेश्वर ट्रॅक्टर्सने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. जलद, दर्जेदार आणि विश्वासार्ह सेवा देत सावळेश्वर उद्योग समूहाचे संस्थापक-अध्यक्ष रमेशदादा आजबे यांनी हजारो शेतकरी बांधवांचा विश्वास संपादन केला आहे.नवीन Swaraj 855 FE Protek हे मॉडेल शेतकरी बांधवांसाठी अधिक कार्यक्षम आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ देणारे ठरेल, असा विश्वास आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande