
छत्रपती संभाजीनगर, 16 ऑगस्ट (हिं.स.)।
श्रीक्षेत्र पैठण येथे चिन्मयमुर्ती संस्थान उमरखेडचे मठाधिपती
प.पू. माधवानंद स्वामी गुरु वामनानंद स्वामी महाराज यांच्या उपस्थितीत आयोजित चातुर्मास अनुष्ठान महोत्सव – २०२६ पैठण येथे सुरू झाला आहे.
शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांनीकार्यक्रमास भेट देऊन दर्शन घेतले व या भक्तिमय सोहळ्यात सहभागी झाले.
चातुर्मास हा भारतीय संतपरंपरेतील अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक साधनेचा काळ. या काळात होणारे धार्मिक अनुष्ठान, प्रवचन, साधना आणि भक्तिसेवा यामुळे भाविकांना अध्यात्मिक ऊर्जा व सकारात्मक प्रेरणा मिळते, असे खासदार भुमरे म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis