बीड जलसंधारण सप्ताह : यावर्षीची संकल्पना 'सेव वॉटर, सिक्युर' अशी निश्चित
बीड, 16 ऑगस्ट (हिं.स.)। राज्याचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस जलसंधारण दिन म्हणून राज्यभर साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. त्या अनुषंगाने जलसंधारण सप्ताह सुरू होत असून, यावर्षीची संकल्पना (थी
अ


बीड, 16 ऑगस्ट (हिं.स.)।

राज्याचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस जलसंधारण दिन म्हणून राज्यभर साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. त्या अनुषंगाने जलसंधारण सप्ताह सुरू होत असून, यावर्षीची संकल्पना (थीम) सेव वॉटर, सिक्युरअशी निश्चित करण्यात आलेली आहे.

त्याच अनुषंगाने रोहिणी विभागांतर्गत मृदा व जलसंधारणाची विविध कामे आष्टी विधानसभा मतदारसंघात प्रगतिपथावर असून, यामध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत गाव तलाव व पाझर तलावांची दुरुस्ती, पाणीगळती प्रतिबंध, तसेच सांडवा दुरुस्ती इत्यादी कामे मोठ्या प्रमाणावर होणार आहेत. यातीलच काही कामांना प्रत्यक्ष भेट देऊन, जलसंधारण सप्ताह अभियानाचे औचित्य साधत प्रातिनिधिक स्वरूपात कामांची प्रत्यक्ष पाहणी आमदार सुरेश धस यांनी केली.

यावेळी रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी श्री. प्रबोधन मुळे , उपविभागीय अधिकारी (पाटोदा) श्रीमती सीमा शेख, तहसीलदार (पाटोदा) श्री. निलावार, तहसीलदार (आष्टी) श्रीमती वैशाली पाटील, तहसीलदार (शिरूर कासार) श्री. घोळवे , मृदा व जलसंधारण विभागाचे उपविभागीय अधिकारी किरण उदमले यांच्यासह जलसंधारण व जलसंपदा विभागाचे अन्य अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य श्री. महेंद्रजी गरजे, जामगावचे सरपंच श्री. राधेश्याम धस यांच्यासह जामगाव गावातील प्रमुख नागरिक व शेतकरी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande