
परभणी, 16 ऑगस्ट (हिं.स.)। राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये २१ ऑगस्ट रोजी ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर आयोजित करण्यात आल्याची माहिती राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली आहे. या वेळी प्रत्येक पाऊल जलसंवर्धनासाठी, प्रत्येक संकल्प जलसमृद्ध महाराष्ट्रासाठी असे बोर्डीकर म्हणाल्या.
माती आणि पाण्याचे संवर्धन ही केवळ काळाची गरज नाही, तर आपल्या पुढच्या पिढ्यांसाठीची जबाबदारी आहे. याच संदेशाला जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी २१ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ आयोजित करण्यात येत आहे. परभणी जिल्ह्यातही या जलसंवर्धनाच्या लोकचळवळीला व्यापक जनसहभागाची जोड देत, जलसंधारणाचा संदेश घराघरात पोहोचवूया.
या प्रसंगी आमदार राहूल पाटील , जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आदींसह ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, पदाधिकारी, पत्रकार, नागरिक, अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis