नांदेड : लोहा शहरातील मुख्य स्मशानभूमीचा होणार कायापालट!
नांदेड, 16 ऑगस्ट (हिं.स.)।लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी लोहा शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या स्मशानभूमीची पाहणी केली. परिसराचे सुशोभीकरण करणे आणि नागरिकांच्या सोयीसाठी विविध विकासकामे हाती घेणे हा या भेटीचा मुख्य
अ


नांदेड, 16 ऑगस्ट (हिं.स.)।लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी लोहा शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या स्मशानभूमीची पाहणी केली. परिसराचे सुशोभीकरण करणे आणि नागरिकांच्या सोयीसाठी विविध विकासकामे हाती घेणे हा या भेटीचा मुख्य उद्देश होता.

लवकरच संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाचे अंदाजपत्रक तयार करून स्मशानभूमीच्या सुशोभीकरणाचे आणि नूतनीकरणाचे काम प्रत्यक्ष सुरू करण्यात येईल.

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांना उत्तम सुविधा देण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत! असे आमदार चिखलीकर यांनी सांगितले

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande