वीज ग्राहकांसाठी दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’
पुणे, 16 ऑगस्ट (हिं.स.) वीज ग्राहकांच्या समस्या आणि तक्रारींचे स्थानिक पातळीवर तातडीने निराकरण करण्यासाठी महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’ आयोजित करण्यात येणार आहे. पुणे परिमंडळातील ५२ उपविभागीय कार्यालयांमध्ये प्रत्येक महिन्याच
mahavtran


पुणे, 16 ऑगस्ट (हिं.स.)

वीज ग्राहकांच्या समस्या आणि तक्रारींचे स्थानिक पातळीवर तातडीने निराकरण करण्यासाठी महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’ आयोजित करण्यात येणार आहे. पुणे परिमंडळातील ५२ उपविभागीय कार्यालयांमध्ये प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत हे शिबिर घेण्यात येणार आहे.या शिबिरात ग्राहकांना वीजबिलातील तक्रारी, वीजपुरवठ्याच्या समस्या, मीटर, नवीन वीजजोडणी तसेच महावितरणच्या विविध सेवांशी संबंधित तक्रारी थेट संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडता येणार आहेत. तक्रारींवर स्थानिक पातळीवर आवश्यक कार्यवाही करून त्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांमध्ये असलेले गैरसमज आणि संभ्रम दूर करण्यासाठी शिबिरात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्मार्ट मीटरची कार्यपद्धती, त्याचे फायदे तसेच महावितरणच्या विविध सेवा व योजनांची माहितीही ग्राहकांना देण्यात येणार आहे.ग्राहकांनी आपल्या संबंधित महावितरण उपविभागीय कार्यालयात आयोजित या शिबिरात सहभागी होऊन समस्या मांडाव्यात आणि त्यांचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande