सोलापूर - श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन
सोलापूर, 16 ऑगस्ट (हिं.स.)। सोलापूर शहरातील श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री तथा ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस
सोलापूर - श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन


सोलापूर, 16 ऑगस्ट (हिं.स.)। सोलापूर शहरातील श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री तथा ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.सोलापूर शहरातील महिलांनी एकत्र येऊन स्थापन केलेली ही पतसंस्था महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. बचत, स्वयंरोजगार आणि आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी संस्थेचे कार्य उपयुक्त ठरेल. संस्थेची पुढील वाटचाल अधिक सक्षम आणि यशस्वी व्हावी, यासाठी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमात सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे दिनकर देशमुख यांच्या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळाही मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. त्यांच्या कार्यप्रवासाचा आणि अनुभवांचा वेध घेणाऱ्या आत्मचरित्राचे प्रकाशन हा कार्यक्रमातील विशेष क्षण ठरला.यावेळी माजी आमदार राजनमालक पाटील, आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, स्थायी समिती सभापती रणजीता चाकोते, शहराध्यक्ष रोहिणीताई तडवळकर, बापू साठे, ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे, दत्तात्रय भोसले, दिनकर देशमुख, संस्थेच्या अध्यक्षा नीता दिनकर देशमुख, उपाध्यक्षा संगीता महावीर जाधव तसेच संचालक मंडळ उपस्थित होते. ---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande