सोलापुरात भाजप-ठाकरे गटातील वाद चिघळला; अंधारेंची गोरे यांच्यावर पुन्हा टीका
सोलापूर, 16 ऑगस्ट (हिं.स.)। सोलापुरात भारतीय जनता पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यातील राजकीय वाद अधिकच रंगला आहे. संजय राऊत यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर सुरू झालेल्या वाक्युद्धात आता शिवसेना नेत्या सुषमा
sdfg


सोलापूर, 16 ऑगस्ट (हिं.स.)।

सोलापुरात भारतीय जनता पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यातील राजकीय वाद अधिकच रंगला आहे. संजय राऊत यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर सुरू झालेल्या वाक्युद्धात आता शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी गोरे यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे. गोरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर अंधारे यांनी फेसबुक पोस्टद्वारे त्यांना ‘कॉपी करून पास झालेले मंत्री’ असा टोला लगावला आहे.

संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना जयकुमार गोरे यांनी ‘कोण संजय राऊत?’ अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी राऊत यांच्यावर टीका केली. दुसरीकडे, शिवसेना कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून पालकमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी केली होती.

या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर विविध आरोप केले होते. तसेच त्यांनी या आरोपांना उत्तर देण्याचे आव्हानही दिले होते.

दरम्यान, शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गोरे यांनी अंधारे यांच्या आरोपांना उत्तर दिले. त्यांनी अंधारे यांचा उल्लेख ‘मोठ्या भगिनी’ असा केला. अंधारे यांच्यावर थेट टीका न करता त्यांना माहिती देणाऱ्यांवर त्यांनी निशाणा साधला.

मात्र, गोरे यांच्या पत्रकार परिषदेच्या दुसऱ्याच दिवशी सुषमा अंधारे यांनी फेसबुकवर पोस्ट करत त्यांना प्रत्युत्तर दिले. ‘जयकुमार गोरे हे निश्चितपणे कॉप्या करून पास झालेले मंत्री असावेत’, असा दावा करत त्यांनी गोरे यांच्या वक्तव्यावर टीका केली.

अंधारे यांनी पोस्टमध्ये गोरे यांना पत्रकार परिषद घेण्यापूर्वी त्यांच्यावरील आरोपांची संपूर्ण पत्रकार परिषद पाहण्याचा सल्ला दिला. तसेच गोरे यांना त्यांच्या आजूबाजूच्या व्यक्तींकडून चुकीचे ब्रीफिंग मिळाल्याचा आरोपही त्यांनी केला.

गोरे यांच्या वक्तव्यावर टीका करताना अंधारे यांनी भाजपच्या मंत्र्यांच्या भाषेवरही निशाणा साधला. “भाजपचा मंत्री म्हटल्यावर ही भाषा फारच सहज स्वाभाविक आहे,” अशा शब्दांत त्यांनी गोरे यांच्यावर टीका केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande