पुणे - वडगाव रेल्वे गेट तीन दिवस वाहतुकीसाठी बंद
पुणे, 16 ऑगस्ट (हिं.स.)। कामशेत ते तळेगाव रेल्वे स्थानकादरम्यान देखभाल-दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने वडगाव येथील रेल्वे गेट क्रमांक ४९ तीन दिवस दळणवळणासाठी बंद राहणार आहे.रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, सोमवार (दि. १७) सकाळी ९ वाजल्यापासू
पुणे - वडगाव रेल्वे गेट तीन दिवस वाहतुकीसाठी बंद


पुणे, 16 ऑगस्ट (हिं.स.)।

कामशेत ते तळेगाव रेल्वे स्थानकादरम्यान देखभाल-दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने वडगाव येथील रेल्वे गेट क्रमांक ४९ तीन दिवस दळणवळणासाठी बंद राहणार आहे.रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, सोमवार (दि. १७) सकाळी ९ वाजल्यापासून बुधवार (दि. १९) सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे रेल्वे गेट बंद राहील.या कालावधीत नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande