
अमरावती, 17 ऑगस्ट (हिं.स.)।
गेल्या दीड महिन्यात पोलिसांनी जिल्ह्याभरात शाळा, महाविद्यालय परिसरातील पानठेल्यावर कारवायांचे सत्र राबविले. दरम्यान, कोटपा कायद्यांतर्गत ३८० कारवाई करण्यात आल्या असून, २५७ पानठेले बंद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ९८० शाळा, महाविद्यालय तंबाखुमुक्त व नशामुक्त झाल्या आहेत. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय परिसरात अंमलीपदार्थ व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, वापरास प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने जिल्हा पोलिस दलाने एक जुलैपासून विशेष मोहिम राबविली आहे. या कालावधीत विशेष तपासणी पोलिसांनी केली. यात प्रामुख्याने अंमली पदार्थ, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री व सेवन करणार्!यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने कोटपा कायदा २००३ अन्वये शैक्षणिक परिसरात एकूण ३८० कारवाया करण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने २५७ पानठेले बंद करण्याचे निर्देश देण्यात आले असून, ९८० शाळा, महाविद्यालय तंबाखूमुक्त व नशामुक्त झाल्या आहेत. अभियानादरम्यान शैक्षणिक परिसराच्या आजूबाजूला तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणार्!या दुकानदार तसेच नियमांचे उल्लंघन करणार्!यांची तपासणी केली. या कारवाई जप्त केलेला तंबाखूजन्य पदार्थांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी हे अंमल पदार्थ व तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहावे, यासाठी पोलिस विभागाकडून जनजागृती समुपदेशन व प्रतिबंधात्मक उपाय योजनांवर विशेष भर देण्यात आला आहे. शैक्षणिक परिसरात अंमली पदार्थ अथवा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, सेवन करणार्!यांविरोधात सातत्याने कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
नशामुक्त युवा सुरक्षित समाज या संकल्पनेनुसार पालक, शिक्षक, विद्यार्थी, दुकानदार व नागरिकांनी अभियानास सहकार्य करावे. तसेच शैक्षणिक परिसर नशामुक्त व तंबाखूमुक्त ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा. शैक्षणिक परिसरात अंमली पदार्थ, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, सेवन करणार्!यांवर कारवाई केल्या जाईल. - कुमार चिंता, पोलिस अधीक्षक, यवतमाळ.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी