नागपंचमीच्या भक्तिमय वातावरणात अक्कलकोटमध्ये श्री नागलिंगेश्वर यात्रा
सोलापूर, 17 ऑगस्ट (हिं.स.)। नागपंचमीच्या पावन पर्वानिमित्त धनगर गल्ली येथे श्री नागलिंगेश्वर यात्रा आणि ढोळ्ळीन गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक
sdfg


सोलापूर, 17 ऑगस्ट (हिं.स.)। नागपंचमीच्या पावन पर्वानिमित्त धनगर गल्ली येथे श्री नागलिंगेश्वर यात्रा आणि ढोळ्ळीन गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमाला उपस्थित राहून श्री नागलिंगेश्वर महाराजांचे दर्शन घेतले. लोकपरंपरा, लोककला आणि सांस्कृतिक वारसा जपणारे उत्सव समाजातील बंधुभाव आणि एकोपा अधिक दृढ करण्याचे काम करतात, असे यावेळी सांगण्यात आले.नागपंचमीच्या निमित्ताने श्री नागलिंगेश्वर महाराजांच्या चरणी नतमस्तक होत सर्वांच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि मंगलमय भविष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.कार्यक्रमाला नगरसेवक लक्ष्मीकांत धनशेट्टी, संजय घोडके, मेजर अंबाजी बदिछोडे, शिखरु शेख, नागेश घोडके, चंद्रकांत मोटे, दशरथ कोरे, रायप्पा पुजारी, सदाशिव पुजारी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande