अकोला : काँग्रेसचे माजी नगरसेवकांसह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
अकोला, 17 ऑगस्ट (हिं.स.) : श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी अकोला शहराच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली. काँग्रेसचे माजी नगरसेवक रवी शिंदे आणि माजी नगरसेविका सौ. चांदणी रवी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मागासवर्गीय काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्या
Photo


अकोला, 17 ऑगस्ट (हिं.स.) : श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी अकोला शहराच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली. काँग्रेसचे माजी नगरसेवक रवी शिंदे आणि माजी नगरसेविका सौ. चांदणी रवी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मागासवर्गीय काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, आमदार वसंत खंडेलवाल आणि जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

पक्षप्रवेशानंतर बोलताना रवी शिंदे आणि सौ. चांदणी शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. “सबका साथ, सबका विकास” आणि “अंत्योदय” या विचारांनी प्रेरित होऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.गेल्या अनेक वर्षांपासून अकोला शहरातील, विशेषतः अशोकनगर तसेच उत्तर आणि दक्षिण मंडळातील नागरिकांसाठी समाजसेवेच्या माध्यमातून काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले. भाजपच्या मजबूत संघटनात्मक व्यासपीठावरून शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी अधिक प्रभावीपणे काम करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच पक्षाची निष्ठेने सेवा करण्याची ग्वाही दिली.

पक्ष संघटनेला बळ मिळेल : सावरकर

आमदार रणधीर सावरकर यांनी महायुती सरकारच्या काळात अकोल्याचा सर्वांगीण विकास होत असल्याचे सांगितले. सौ. चांदणी शिंदे यांच्या सक्रियतेमुळे भाजपच्या पक्ष संघटनेला बळ मिळेल आणि त्यांच्या कर्तृत्वाचा पक्षाला लाभ होईल, असे त्यांनी नमूद केले.मनपा समिती सभापती विजय अग्रवाल यांनीही चांदणी शिंदे यांच्या सामाजिक कार्याचा उल्लेख केला. गेल्या पाच वर्षांत त्यांनी समाजातील विविध घटकांना एकत्रित केले असून, पक्षप्रवेशावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती ही त्यांच्या लोकप्रियतेचे द्योतक असल्याचे त्यांनी सांगितले.

अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

या पक्षप्रवेशात बजरंग बागडे, विक्की शिंदे, शरद बनसोड, एम. जमशोदकर, सिद्धार्थ इंगळे, पियुष अग्रवाल, सोनल निवारी, उमा विक्की शिंदे आणि आशिष बुंदले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.यावेळी महानगर अध्यक्ष जयंत मसने, नगरसेवक शरद तुरकर, ॲड. देवाशिष काकड, संजय गोटफोडे, राजेंद्र गिरी, संदीप गावंडे, गोपाल मुळे, रणजीत खेडकर, माधव मानकर, विवेक भरणे, विद्याधर काकड, वैशालीताई शेळके, अनिता चौधरी, बल्लू चौधरी, उज्वल बामनेट, रुपेश यादव, शाहूताई, रवी यादव, आम्रपाली उपरवट आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यकर्त्यांच्या योग्यतेचा सन्मान करू : सावरकर

भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या योग्यतेचा सन्मान करून पक्ष संघटनेत त्यांना योग्य संधी दिली जाईल, असे आमदार रणधीर सावरकर यांनी यावेळी सांगितले.

00000000000000000000000

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande